सिमेंट बांध कार्यक्रम
सिमेंट बांध कार्यक्रम
राज्यातील पाण्याची उपलब्धता व वारंवार येणारी दुष्काळ सदृश परिस्थिती तसेच पावसाची अनियमितता यामुळे कृषि क्षेत्रावर होणा-यावर परिणामाचा विचार करून अर्वषण प्रवण तालुक्यामध्ये राज्य निधीतून सिमेंट नाला बांध बांधण्याचा सन 2012-13 पासून कार्यक्रम हाती घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सिंचन निर्मितीसह पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण करणे, पाण्याचे पुनर्भरण करून भूजल पातळी वाढविणे व त्याद्वारे शेतक-यांना संरक्षित सिंचनाचा लाभ देणे हे प्रमुख उद्देश आहेत.
सन 2014-15 ते सन 2018-19 मध्ये राज्यात जलयुक्त शिवार अभियानामधील गावामध्ये तसेच सन 2015-16 पासून ते सन 2017-18 नदी पुनर्जीवन कार्यक्रम मध्ये नदी/नाले/ओढे यावर सिमेंट बंधारे बांधण्यात आले.
सन 2021-22 मध्ये सिमेंट बांध कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेवून प्रचलित मार्गदशक सूचना/शासन निर्णय यांचे एकत्रिकरण करून मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेच्या धर्तीवर सिमेंट बंधा-याची नवीन कामे हाती घेण्यासंदर्भात नवीन धोरण ठरवून शासन निर्णय दिनांक 31/05/2022 अन्वये एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. याद्वारे आता छोट्या नद्या/नाले/ओढे यावर सिंमेंट बंधारे बांधण्यासह नाला खोलीकरण व सरळीकरण कामे करण्यात येतात.
सिमेंट बांध कार्यक्रमांतर्गत राज्य स्तरावरून प्रशासकीय मान्यता देवून लेखाशीर्ष 4402 2799 मध्ये निधीचे वितरण करण्यात येत आहे. सदर योजनेसाठी सन 2022-23 मध्ये ₹2.02 कोटी, सन 2023-24 मध्ये ₹132.00 कोटी खर्च करण्यात आलेला आहे. सन 2024-25 करिता ₹200.00 कोटी निधी अर्थसंकल्पीत आहे.
लाभार्थी:
नागरिक
फायदे:
वरीलप्रमाणे
अर्ज कसा करावा
ऑनलाइन