सिमेंट बांध बांधण्याचा कार्यक्रम
सिमेंट बांध बांधण्याचा कार्यक्रम
राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत सन 2011-12 मध्ये राज्यात कमी पाऊस असल्याने 63 तालुक्यांमध्ये सिमेंट नालाबांध बांधण्याचा कार्यक्रम राबविणयात आला आहे. त्याकरीता रा.कृ.वि. योजनेतून रू. 25.00 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या योजनेतून 583 सिमेंट नालाबांध बांधण्यात आले आहेत.
सन 2012-13 मध्ये दि. 20 सप्टेंबर, 2012 चे शासन निर्णयानुसार, राज्यातील 1 जिल्हयांतील 62 तालुक्यांमध्ये उपरोक्त काय्रक्रमासाठी रू.25.00 कोटी इतका निधी राष्ट्रीय कृषी विकास योजनेमधून उपलब्ध करून देण्यात आला आहे. सदर कार्यक्रमांतर्गत 361 सिमेंट नालाबांध बांधण्यात आले आहेत.
राज्यातील पाण्याची उपलब्धता व वारंवार येणारी दुष्काळ सदृश परिस्थिती विचारात घेता राज्यातील टंचाई सदृश परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टीने भूगर्भातील पाण्याची
पातळी २ मीटर पेक्षा जास्त खाली गेलेल्या १५ तालुक्यात सिमेंट नाला बांध बांधण्याचा महत्वपूर्ण कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुषंगाने या कार्यक्रमासाठी रू.१५०.०० कोटी
इतका निधी शासन स्तरावरून उपलब्ध करून देण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली व सदरचा कार्यकम मृदसंधारण विभाग व लघुसिंचन विभागामार्फत राबविण्यात आला. सदर कार्यक्रमांतर्गत १४५० नाला बांध बांधण्यात आले आहेत. पूर्ण झालेल्या सिमेंट नाला बंधाऱ्यांचा लोकार्पण सोहळा दि.९ जून २०१३ रोजी राज्यात एकाच दिवशी संपन्न झाला.
लाभार्थी:
नागरिक
फायदे:
वरीलप्रमाणे
अर्ज कसा करावा
ऑनलाइन