राज्यातील लहान पाटबंधारे योजनांची प्रगणना
राज्यातील लहान पाटबंधारे योजनांची प्रगणना
केंद्र सरकारच्या निकषांप्रमाणे 0 ते 2000 हे.सिं.क्ष. चे प्रकल्प हे लघु पाटबंधारे प्रकल्प समजले जातात. देशातील अशा सर्व प्रकल्पांची केंद्र सरकारद्वारे राज्य शासनाच्या सहकार्याने पंचवार्षिक गणना करण्यात येते. त्यानुसार राज्यातील अशा सर्व प्रकल्पांची प्रत्यक्ष गणना करुन त्याची विहीत प्रपत्रातील माहिती केंद्र सरकारला पाठविण्यात येते. या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारकडून 100% अर्थसहाय्य होते.
आतापर्यंत 5 प्रगणना पूर्ण झाल्या असून, सध्या सन 2017-18 ते 2019-20 या कालावधी मध्ये पूर्ण झालेल्या 0 ते 2000 हे.सिं.क्ष. च्या प्रकल्पांची 6 वी प्रगणना सुरु आहे. 5 व्या प्रगणना कार्यक्रमाचे 100% उद्दिष्ट साध्य झाले असून, संकलित केलेल्या माहितीचे केंद्र सरकारकडून वैधतीकरण झाले असून, सदरची माहिती राज्य शासनाकडून प्रकाशित करण्यात आली आहे.
सदर राष्ट्रीय कार्यक्रमाची राज्यामध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्त मृद व जलसंधारण यांची राज्य प्रगणना आयुक्त म्हणून शासन निर्णय दिनांक 3 मे, 2018 अन्वये नेमणूक करण्यात आलेली आहे.
लघुसिंचन योजना विषयीची 6 वी प्रगणना प्रभावी अंमलबजावणी, कामाचे, सनियंत्रण व समन्वयासाठी शासन निर्णय दिनांक 3 ऑक्टोबर, 2018 अन्वये राज्यस्तरीय सुकाणु व तांत्रिक समिती, महसुल विभाग स्तरीय, जिल्हा स्तरीय व तालुका स्तरीय सनियंत्रण समिती अशा विविध स्तरांवरील समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. 6 व्या प्रगणना कार्यक्रमाची अंदाजी किंमत 10.14 कोटी आहे. तसेच जलसाठा प्रगणना कार्यक्रमाची अंदाजी किंमत रु.5.78 कोटी आहे. या दोन्ही कार्यक्रमाच्या किंमतीस केंद्र सरकारने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
लाभार्थी:
नागरिक
फायदे:
--
अर्ज कसा करावा
…