जलसमृध्दी यंत्रसामुग्री (अर्थमुव्हर्स) व्याज अर्थसहाय्य योजना
जलसमृध्दी यंत्रसामुग्री (अर्थमुव्हर्स) व्याज अर्थसहाय्य योजना
राज्यात जलयुक्त शिवार अभियान / जल व मृद संधारणाची कामे करण्यासाठी यंत्र सामुग्री उपलब्ध करण्याकरीता सुशिक्षित बरोजगार तरुण / बरोजगारांची सहकारी संस्था / नोंदणीकृत गट शेती / शेतकरी उत्पादन संस्था / विविध कार्यकारी संस्था यांना शासनाकडून मृद व जलसंधारण विभाग, सहकार विभाग व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांच्या माध्यमातून “जलसमृध्दी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना” शासन निर्णय दि. २ जानेवारी २०१८ अन्वये सुरु करण्यात आलेली आहे.
योजनेची संक्षिप्त माहिती
या योजनेकरिता महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रथम टप्प्यामध्ये या योजनेचा कालावधी दि. 31 मार्च 2018 पर्यंत होता. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आवश्यक प्रशिक्षण देऊन त्यांना उत्खनन यंत्रसामुग्री (अर्थमुव्हर्स) खरेदी करण्यासाठी वित्तीय संस्थाकडून उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या कर्जावरील व्याजाचे दायित्व शासनातर्फे अदा करण्यात येणार आहे. लाभार्थ्यास कमाल ₹ 17.60 लक्ष कर्ज मर्यादा असेल व व सदर कर्जावरील 5 वर्षाचे कमाल व्याज ₹ 5.90 लक्ष शासनामार्फ़त अदा करण्यात येणार आहे. सदर योजना जिल्हास्तरावर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या मार्फ़त राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्यात 1000 यंत्रसामग्री वाटपाचे उदिष्ट ठेवण्यात आलेले आहे. सदर योजनेच्या तरतुदीमध्ये शासन निर्णय दिनांक 29 ऑक्टोबर, 2018 अन्वये बदल करण्यात आला असुन त्यानुसार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थ्यांच्या निवडीसाठी सुधारित निवड समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच लाभार्थ्यांचा प्राधान्यक्रम रद्द करण्यात आला असुन प्राधान्यक्रमाचा विचार न करता सर्व प्रकारातील पात्र अर्जदारामधून सोडत काढुन लाभार्थी यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्यात येते.
या योजनेमध्ये शासन निर्णय दि. 21 जानेवारी, 2019 अन्वये व्याज परतावा अदायगी पध्दतीमध्ये बदल करण्यात आला असून त्यानुसार वित्तीय संस्थांनी संपुर्ण हफ्ता लाभार्थ्यांकडून वसूल करावयाचा आहे. उत्खनन यंत्रसामुग्री (अर्थमुव्हर्स) करिता शासन अनुज्ञेय असलेली व्याज परताव्याची रक्कम दर 3 महिन्यांनी, लाभार्थ्यांनी हफ्ता भरल्याचा पुरावा सादर करून व्याज परताव्याची मागणी शासनाकडे सादर केल्यानंतर लाभधारकाच्या बचत खात्यात शासनाद्वारे अनुज्ञेय व्याज परतावा रक्कम जमा करण्यात येते. व्याज परताव्याची अधिकतम मर्यादा रु 5.90 लाख असून ती समान हफ्त्यात अदा करण्यात येते.
आर्थिक वर्ष सन 2021-22 साठी उत्खनन (अर्थमुव्हर्स) यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेसाठी रु.10.00 कोटी निधी अर्थसंकल्पीत करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांच्या मागणीनुसार व्याजाचे हप्ते संबंधीत लाभार्थ्यांच्या बचत खात्यात अदा करण्यासाठी आवश्यक रु.4.00 कोटी निधी वितरित करण्यात आला आहे. योजनेअंर्तगत 318 लाभार्थ्यानी यंत्रसामग्री खरेदी केलेली आहे. सदर 318 लाभार्थ्यांना एकुण देय असणारा व्याज परतावा लाभार्थ्यांच्या बचत खात्यावर महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत देण्यात येत आहे.
लाभार्थी:
नागरिक
फायदे:
वरीलप्रमाणे
अर्ज कसा करावा
ऑनलाइन