बंद

    जलयुक्त शिवार अभियान

    • तारीख : 28/01/2025 -
    • जलयुक्त शिवार अभियान (टप्पा-1)

    शासन निर्णय दिनांक 5 डिसेंबर, 2014 अन्वये सन 2015 ते 2019 या कालावधीत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. दरवर्षी 5000 गावे या प्रमाणे 5 वर्षात 25000 गावे टंचाईमुक्त / जलपरिपूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. सदर कार्यक्रमांतर्गतची कामे केंद्र / राज्य सरकार / DPDC च्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून करण्यात आली. तसेच लोकसहभाग, विविध कंपन्यांकडून CSR, अनेक मंदिर न्यासाकडूनही निधी प्राप्त झाला. या बरोबरच निधीची कमतरता भासू नये म्हणून राज्य शासनाने सदर कार्यक्रमासाठी दरवर्षी विशेष निधी उपलब्ध करून दिलेला होता. निवडण्यात आलेल्या गावांचे MRSAC या संस्थेकडील (Remote Sensing & GIS) या आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे क्षमता उपचार नकाशे (Potential Treatment Map) तयार करून देशात प्रथमच वापरण्यात आले. सदरील नकाशे तयार करण्यासाठी महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र, (MRSAC) नागपूर, तसेच भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा (GSDA), पुणे या कार्यालयांनी विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. गावातील पिण्याच्या पाण्याची गरज, शेतीसाठी लागणारे पाणी व जनावरांसाठी लागणारे पाणी विचारात घेऊन, पाणलोटामध्ये उपलब्ध पाणी, वाहून जाणाऱ्या पाण्यामधून किती पाणी अडविले आहे, किती पाणी अडवू शकतो या बाबी विचारात घेऊन पाण्याचा ताळेबंद करण्यात आला. सन 2015 ते 2019 या कालावधीत 22,593 गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 6,32,896 कामे पूर्ण करण्यात आली. जलयुक्त शिवार अभियानामुळे 20,544 गावे 100 टक्के जलपरिपूर्ण झाली असून 27,08,297 टी.सी.एम. इतका जलसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे 39,04,394 हेक्टर सिंचन क्षमता (एक सिंचन दिल्यास) निर्माण झाली आहे.

    • जलयुक्त शिवार अभियान २.०

    जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम न राबविलेल्या व गाव निवडीच्या निकषानुसार पात्र ठरणाऱ्या गावामध्ये मृद व जलसंधारणाची कामे करणे, जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविलेल्या व गावांमध्ये पाण्याची गरज असेल व अडविण्यास अपधाव शिल्लक असेल तेथे पाणलोट विकासाची कामे करणे, जलसाक्षरता द्वारे गावातील पाण्याची उपलब्धता व कार्यक्षम वापर या करीता प्रयत्न करणे, मृद व जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करणे व उपलब्ध भूजलाच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्राचा शाश्वत विकास करण्याकरिता दिनांक ०३ जानेवारी, २०२३ अन्वये “जलयुक्त शिवार अभियान २.०” राबविण्यात येत आहे.


    जलयुक्त शिवार अभियान महत्वाचे शासन निर्णय

    लाभार्थी:

    नागरिक

    फायदे:

    वरीलप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    ऑनलाइन