बंद

उद्दिष्टे आणि कार्ये

कार्ये :-

  1. 600 हेक्टर पर्यंतच्या लहान पाटबंधारे प्रकल्पांची निर्मिती व परिरक्षण करणे.
  2. 600 हेक्टर पर्यंतच्या उपसा सिंचन योजनांची निर्मिती व परिरक्षण करणे.
  3. लोक सहभागामधून मृद जलसंधारण व वॉटर हार्वेस्टिंगच्‍या मत्‍तांची निर्मिती व परिरक्षण करणे.

उद्दिष्ट :-

  1. जलसंधारण विभागाने निश्चित केलेली भौतिक उद्दिष्‍टे साध्‍य करणे.
  2. एकात्मिक पाणलोट विकास व्‍यवस्‍थापन कार्यक्रमासाठी चांगल्‍या दर्जाचे प्रशिक्षण देणे व कार्यक्रम अंमलबजावणीसाठी पूर्व तयारी करणे.
  3. स्‍थानिक क्षेत्रासाठी पाणी वापर विभागांची निर्मिती व ते क्रियाशील करणे.
  4. सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी पूर्ण करण्यात आलेल्या मत्तांची पडताळणी करणे व माहिती संग्रह करणे.
  5. मृद व जलसंधारण कार्यक्रमामध्ये लोकसहभागास प्रोत्साहन देणे.
  6. राज्य शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या निधीपैकी कमाल निधीचा विनियोग 31 मार्चपर्यंत करणे.
  7. मृद व जलसंधारण कार्यक्रमामध्‍ये लोक सहभागास प्रोत्‍साहन देणे.
  8. जलसंधारण विभागाचे संनियंत्रण व मूल्यमापन करण्याच्या कार्यपध्दती सुरु करणे.