National Emblem of India
ध्‍येय
लोक सहभागावर तसेच नैसर्गिक साधनसंपत्‍तीवर आधारित राज्‍यातील ग्रामीण भागातील सर्व कार्यामध्‍ये जल व मृदसंधारणाच्‍या प्रथा खोलवर रुजवून हरित ग्रामीण महाराष्‍ट्राची उभारणी करणे
कार्यदृष्‍टी :-
1. सामाजिक वनीकरणास प्रोत्‍साहन देणे.
2. मर्यादित साधनसंपत्‍तीच्‍या प्रभावी शास्‍त्रीय व्‍यवस्‍थापनासाठी पाणलोटनिहाय मृद व जलसंधारणांच्‍या प्रथांना प्रोत्‍साहन/चालना देणे.
कार्ये :-
1. 250 हे. च्‍या आतील लघुपाटबंधारे प्रकल्‍पांची निर्मिती व परिरक्षण करणे.
2. लोक सहभागामधून मृद जलसंधारण व वॉटर हार्वेस्टिंगच्‍या मत्‍तांची निर्मिती व परिरक्षण करणे.
उदिष्‍ट :-
1. जलसंधारण विभागाने निश्चित केलेली भौतिक उद्दिष्‍टे साध्‍य करणे.
2. एकात्मिक पाणलोट विकास व्‍यवस्‍थापन कार्यक्रमासाठी चांगल्‍या दर्जाचे प्रशिक्षण देणे व कार्यक्रम अंमलबजावणीसाठी पूर्व तयारी करणे.
3. स्‍थानिक क्षेत्रासाठी पाणी वापर विभागांची निर्मिती व ते क्रियाशील करणे.
4. संचालक, मृदसंधारण यांच्‍या कार्यामध्‍ये सुधारणा करण्‍यासाठी दीर्घ मुदतीची उपाययोजना करणे.
5. सामाजिक वनीकरण विभागाची पुनर्रचना करण्‍यासाठी आवश्‍यक पाऊले उचलणे.
6. सिंचनाच्‍या सुविधा निर्माण करण्‍यासाठी पूर्ण करण्‍यात आलेल्‍या मत्‍तांची पडताळणी करणे व माहिती संग्रह करणे.
7. मृद व जलसंधारण कार्यक्रमामध्‍ये लोक सहभागास प्रोत्‍साहन देणे.
8. राज्‍य शासनाने उपलब्‍ध करुन दिलेल्‍या निधीपैकी किमान 85% निधीचा विनियोग 31 मार्चपर्यंत करणे.
9. जलसंधारण विभागाचे संनियंत्रण व मूल्‍यमापन करण्‍याच्‍या कार्यपध्‍दती सुरु करणे.
10. मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड करण्‍यासाठी ग्राम पंचायतींमार्फत क्षमता निर्धारणासाठी साम‍ाजिक वनीकरणाच्‍या माध्‍यमाचा वापर करुन घेणे.