मंडळे/उपक्रम
महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, छत्रपती संभाजीनगर
महामंडळाची स्थापना:
महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाची स्थापना दि. 22 ऑगस्ट, 2000 रोजी झालेली असून महामंडळाचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे.
महामंडळाचा उद्देश:
महामंडळ स्थापनेचा मुख्य उद्देश राज्यातील 600 हेक्टर पर्यंतच्या सिंचन क्षमतेचे लघु पाटबंधारे प्रकल्प, पाणलोट व मृदसंधारण आणि सामाजिक वनीकरण, इत्यादी कामांचे प्रचालन, प्रवर्तन आणि शीघ्र विकास व नियमन करणे हा आहे.
महामंडळाची रचना:
- मा. मंत्री, मृद व जलसंधारण – पदसिध्द अध्यक्ष
- मा. राज्यमंत्री, मृद व जलसंधारण – पदसिध्द उपाध्यक्ष
- मा. मंत्री, कृषि – पदसिध्द सदस्य
- मा. मंत्री, जलसंपदा – पदसिध्द सदस्य
- मा. प्रधान सचिव (वित्त) – पदसिध्द सदस्य
- मा. प्रधान सचिव (नियोजन) – पदसिध्द सदस्य
- मा. प्रधान सचिव (वने) – पदसिध्द सदस्य
- मा. प्रधान सचिव (कृषि) – पदसिध्द सदस्य
- मा. प्रधान सचिव (जलसंपदा) – पदसिध्द सदस्य
- मा. प्रधान सचिव (मृद व जलसंधारण) – पदसिध्द सदस्य
- मा. सचिव (ग्रामविकास) – पदसिध्द सदस्य
- संचालक, महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजना केंद्र, नागपूर – पदसिध्द सदस्य
- संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे – पदसिध्द सदस्य
- व्यवस्थापकीय संचालक – सदस्य सचिव
कार्यकारी समिती:
अधिनियमातील कलम 5 व महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ सुधारणा अधिनियम 2001 (क 20) अनुसार महामंडळाच्या कार्यकारी समितीत खालील सदस्यांचा समावेश आहे:
- मा. मंत्री, मृद व जलसंधारण – पदसिध्द अध्यक्ष
- मा. राज्यमंत्री, मृद व जलसंधारण – पदसिध्द उपाध्यक्ष
- अपर आयुक्त, जलसंधारण तथा मुख्य अभियंता, मृद व जलसंधारण, प्रादेशिक क्षेत्र पुणे – पदसिध्द सदस्य
- संचालक, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, पुणे – पदसिध्द सदस्य
- प्रधान मुख्य वनसंरक्षक व महासंचालक, सामाजिक वनिकरण, पुणे – पदसिध्द सदस्य
- मुख्य लेखा व लेखा परीक्षा अधिकारी, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, औरंगाबाद – पदसिध्द सदस्य
- व्यवस्थापकीय संचालक – सदस्य सचिव
लेखा विषयक धोरण:
महामंडळाने रोख लेखा पध्दतीची प्रणाली अवलंबिली आहे. महामंडळामार्फत केली जाणारी कामे ही महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिका व संहिता तसेच मृद व जलसंधारण विभागाने निर्देशित केल्यानुसार आणि जलसंपदा विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार केली जातात.