आदर्शगाव विकास कार्यक्रम
आदर्शगाव विकास कार्यक्रम
- क्रांती दिनाच्या स्वर्णमहोत्सवी वर्षाचे निमित्ताने थोर स्वातंत्र्यसेनानी कै.डॉ.अच्युतराव पटवर्धन यांच्या सूचनेनुसार व मा. अण्णासाहेब हजारे यांचे मार्गदर्शनाखाली राळेगणसिध्दी धर्तीवर राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक गाव स्वयंपूर्ण करण्याच्या संकल्पनासह सन 1992 मध्ये आदर्शगांव विकास योजना सुरु झाली. ग्रामीण विकासासाठी राज्य शासनामार्फत ग्रामपातळीवर राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये योग्य समन्वय, स्थानिक जनतेचे सहकार्य मिळाल्यास ग्रामविकास चांगल्या पध्दतीने होते हे शासनाच्या लक्षात आल्याने स्थानिक जनतेचा प्रतिसाद, तसेच स्वयंसेवी संस्थेचा सहभाग केंद्रस्थानी गावाचा विकास हे आदर्शगाव योजनेचे ठळक वैशिष्ट्य आहे.
- गाभा व बिगर गाभा क्षेत्राचा विकास व चराई बंदी, कुऱ्हाड बंदी, नसबंदी, नशाबंदी, निर्मलग्राम (लोटाबंदी), बोअरवेल बंदी व श्रमदान या सप्तसुत्रीचे पालन गावाने व ग्रामसभेने निवडलेल्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून करणे.
- मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाची कामे गाभा क्षेत्र विकासाचे काम म्हणून संबोधण्यात येते. यामध्ये मृदसंधारण, सामाजिक वनीकरण, वनखाते व लघुपाटबंधारे या विभागाचे कामाचा समावेश आहे. सन 2024-25 मध्ये माहे मार्च, 2025 अखेर 157 गावे निवडण्यात आली असून 91 गावे पूर्ण आहेत व 44 गावे सक्रीय आहेत.
- बिगर गाभा क्षेत्रातील कामे संबंधित विभागाने त्यांचे मंजूर अनुदानातून प्राधान्याने पूर्ण करावीत, असे अभिप्रेत आहे.
- योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामविकास व जलसंधारण विभाग, शासन निर्णय क्र. आगायो-2013/प्र.क्र.162/जल-8, दिनांक 10 मार्च, 2015 अन्वये, सर्वसमावेशक नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
उद्देश:-
लोककार्यक्रमात शासनाचा सहभाग या सूत्रानुसार गावाच्या सर्वांगीण विकासाबरोबरच गावाची सामाजिक शिस्त सुधारुन प्रत्येक तालुक्यातून एक पथदर्शक अशा स्वयंपूर्ण गाव निर्माण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
संबंधित शासन निर्णय व परिपत्रके
अ.क्र. | शासन निर्णय/परिपत्रक | दिनांक | विषय | पीडीएफ फाईल |
---|---|---|---|---|
१ | शासन निर्णय | दि.२०.०२.२०१८ | आदर्शगांव योजनेंतर्गत महाराष्ट्र आदर्शगाव भूषण पुरस्काराच्या समितीची फेररचना करणेबाबत. | जीआर २०.०२.२०१८ [पीडीएफ 222 केबी] |
२ | शासन निर्णय | दि.२८.०४.२०२२ | आदर्शगाव योजनेंतर्गत यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्र हिवरेबाजार ता.जि.अहमदनगर कार्यान्वित करणेसाठी अभ्यासगट गठीत करणेबाबत… | जीआर २८.०४.२०२२ [पीडीएफ 149 केबी] |
३ | शासन निर्णय | दि.०५.०२.२०२४ | आदर्शगाव योजनेमधील राज्यस्तरीय समितीत सुधारणा करण्याबाबत. | जीआर ०५.०२.२०२४ [पीडीएफ 148 केबी] |
४ | शासन निर्णय | दि.०१.११.२०१७ | आदर्शगांव योजनेंतर्गत महाराष्ट्र आदर्शगाव भूषण पुरस्कार देणेबाबत. | जीआर ०१.११.२०१७ [पीडीएफ 3.1 एमबी] |
लाभार्थी:
नागरिक
फायदे:
वरीलप्रमाणे