बंद

    100 दिवस कार्यक्रम अहवाल

    १०० दिवस कार्यक्रमाची सद्य:स्थिती निहाय माहिती
    मुद्दा क्र. मुद्दा कार्यवाही पूर्ण / अपूर्ण पूर्ण असल्यास त्याबाबतची माहिती शासन निर्णय / फोटो / इ. अभिलेख किंवा लिंक अपूर्ण असल्यास सद्य:स्थिती व कार्यवाही पूर्ण करण्याची कालमर्यादा
    1 जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत प्रशासकीय मान्यताप्राप्त व प्रगतीपथावर असलेली मृद व जलसंधारणाची 25,000 कामे पूर्ण करणे. कार्यवाही पूर्ण योजनेंतर्गत एकूण 31,353 कामे पूर्ण झाली आहेत. पूर्ण कामांची जिल्हानिहाय यादी

    निरंक
    2 केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक – 2.0 या योजनेच्या नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन (NRM) या घटकांतर्गत अंतर्गत 10000 कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देणे. कार्यवाही पूर्ण योजनेंतर्गत 11327 कामांना तांत्रिक व 10031 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कामांची जिल्हानिहाय यादी

    निरंक
    3 केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक – 2.0 या योजनेच्या नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन (NRM) या घटकांतर्गत अंतर्गत 12000 कामे पूर्ण करणे. कार्यवाही पूर्ण योजनेंतर्गत 16247 कामे पूर्ण झाली आहेत. कामांची जिल्हानिहाय यादी

    निरंक
    4 मृद व जलसंधारण विभागांतर्गत 600 हेक्टर पेक्षा कमी सिंचन क्षमतेचे बांधकामाधीन असलेले 3083 लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करणे. कार्यवाही पूर्ण लघु पाटबंधारे प्रकल्पांची 3084 कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण झाली आहेत. जिल्हानिहाय यादी

    निरंक
    5 महाराष्ट्र राज्यात गतवर्षांमध्ये विविध योजनेंतर्गत पाणलोट क्षेत्रामध्ये पूर्ण झालेल्या मृद संधारण व जल संधारण संरचनांचे शिवार फेरीद्वारे प्रत्यक्ष स्थळपडताळणी करण्याबाबत आवश्यक तांत्रिक सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र, नागपूर (MRSAC) यांच्यासोबत सामंजस्य करार (MoU) करणे. कार्यवाही पूर्ण दि.03.02.2025 रोजी MRSAC आणि मृद व जलसंधारण विभाग यांच्यामध्ये MoU झाला आहे. छायाचित्र

    निरंक
    6 महाराष्ट्र राज्यात गतवर्षांमध्ये विविध योजनेंतर्गत पाणलोट क्षेत्रातील पूर्ण झालेल्या मृद संधारण व जल संधारण संरचनांची प्रत्यक्ष स्थळ पडताळणी करुन सर्व माहिती एकाच‍ डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्रित करण्यासाठी MRSAC कडून मोबाइल / डिजीटल ॲप तयार करणे. कार्यवाही पूर्ण डिजिटल ॲप तयार करण्यात आले आहे. निरंक
    7 महाराष्ट्र राज्यात गतवर्षांमध्ये विविध योजनेंतर्गत पाणलोट क्षेत्रातील पूर्ण झालेल्या मृद संधारण व जल संधारण कामांची शिवारफेरीद्वारे मोबाइल/ डिजीटल ॲप च्या सहाय्याने प्रत्यक्ष स्थळ पडताळणी करणेबाबत प्रशिक्षण देणे. कार्यवाही पूर्ण दि.21.03.2025 रोजी विभागाच्या उपविभागीय जलसंधारण अधिकारी व जलसंधारण अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षण व्हिडिओ निरंक
    8 केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक – 2.0 या योजनेंतर्गत प्रकल्प क्षेत्रामध्ये पाणलोट विकासासंदर्भात सर्वसामान्य जनसमुदायामध्ये जनजागृती करण्यासाठी आयोजित वॉटरशेड यात्रेचे तीन रथमार्ग निश्चित करणे आणि रथ यात्रेचा शुभारंभ करणे. कार्यवाही पूर्ण दि.08.02.2025 रोजी दोन मार्गांनी व दि.24.02.2025 रोजी एक मार्गाने अशा तीन मार्गांनी वाटरशेड यात्रेचा राज्यातील 280 गावांमध्ये शुभारंभ होऊन दि.16.04.2025 रोजी वाटरशेड यात्रा पूर्ण झाली आहे. छायाचित्र

    निरंक
    9 देवनदीवरुन कुंदेवाडी ते सायाळे पूर कालवा, ता. सिन्नर, जि. नाशिक- 4 कि.मी. लांबीची पुरचारी बांधून त्याव्दारे 7 तलाव भरण्याची व्यवस्था करुन 15 द.ल.घ.फू. इतका पाणीसाठा व 75 ते 90 हेक्टर सिंचन क्षमता निर्मिती करणे. कार्यवाही पूर्ण भौतिकदृष्ट्या 100% काम पूर्ण झाले आहे. छायाचित्र

    निरंक
    10 आदर्शगाव योजनेंतर्गत हिवरे बाजार येथे बांधण्यात येत असलेल्या प्रशिक्षण केंद्राच्या अनुषंगिक कामाचे भुमीपूजन करणे. कार्यवाही पूर्ण दिनांक 22.03.2025 रोजी प्रशिक्षण केंद्राचे भूमीपूजन झाले आहे. छायाचित्र

    निरंक
    11 मृद व जलसंधारण विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांमधील जलसंधारण अधिकारी गट-ब (अराजपत्रित) या पदांसाठी निवड झालेल्या एकूण 666 उमेदवारांची नियुक्ती करणे. कार्यवाही पूर्ण मृद व जलसंधारण विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांमधील जलसंधारण अधिकारी गट-ब (अराजपत्रित) यांना दि.13.02.2025 रोजी नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. छायाचित्र

    निरंक
    12 मृद व जलसंधारण विभागातील तांत्रिक मनुष्यबळाच्या कार्यक्षमतेत व उत्पादकतेत वाढ करण्यासाठी सुधारित प्रशिक्षण मोड्यूल तयार करणे. कार्यवाही पूर्ण प्रशिक्षण मोड्यूल संदर्भातील शासन निर्णय दि.27.03.2025 रोजी निर्गमित करण्यात आला असून प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. शासन निर्णय

    निरंक
    13 महाराष्ट्र जलसंधारण महामंडळांतर्गत प्रलंबित 116 भूसंपादन प्रकरणांपैकी 30 प्रकरणे निकाली काढणे. कार्यवाही पूर्ण 43 भूसंपादन प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. प्रकरणांची यादी

    निरंक
    14 महाराष्ट्र जलसंधारण महामंडळांतर्गत भूसंपादनाच्या प्रलंबित असलेल्या 38 न्यायालयीन प्रकरणांपैकी 24 प्रकरणे निकाली काढणे. कार्यवाही पूर्ण भूसंपादनाची 24 न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. प्रकरणांची यादी

    निरंक
    15 देवनदीवरुन खोपडी ते मिरगाव पूर कालवा काढणे, ता.सिन्नर, जि. नाशिक – या अंतर्गत 4 कि.मी. लांबीची पुरचारी बांधून त्याद्वारे 5 तलाव भरण्याची व्यवस्था करुन 19 द.ल.घ.फू. इतका पाणीसाठा व 95 ते 114 हेक्टर सिंचन क्षमता निर्मिती करणे. कार्यवाही पूर्ण छायाचित्र

    योजनेचे काम भौतिक दृष्ट्या पूर्ण झाले असून २४ किमी चारीची चाचणी पूर्ण झाली आहे. ३०० मी. चरीची चाचणी करणे बाकी आहे.
    16 गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत जलस्त्रोतांची साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी गाळाचा उपसा करणे आणि उपसा केलेला गाळ शेतकऱ्यांच्या जमीनीवर पसरवून जमीनीची उत्पादकता वाढविण्यासाठी राज्यातील 1000 जलाशयातून सुमारे 2.50 कोटी घ. मी. एवढा गाळ काढणे. कार्यवाही पूर्ण जिल्हानिहाय यादी

    गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेंतर्गत २.५० कोटी घ.मी. एवढा गाळ काढण्यात आला आहे.
    17 पाणलोट क्षेत्रातील पूर्ण झालेल्या मृद संधारण व जल संधारण कामांची शिवारफेरीद्वारे मोबाइल/ डिजीटल ॲप च्या सहाय्याने प्रत्यक्ष स्थळ पडताळणीचे काम सुरु करणे. कार्यवाही अपूर्ण (प्रगतीपथावर) शिवार फेरीव्दारे दि. 01.04.2025 ते दि. 31.05.2025 दरम्यान प्रत्यक्ष स्थळसत्यता पडताळणी करण्याचा शासन निर्णय दि. 12.03.2025 रोजी निर्गमित करण्यात आला असून क्षेत्रिय स्तरावर पडताळणीचे काम सुरू झाले आहे. सद्यस्थितीत कार्यक्रमांतर्गत सुमारे 15 लक्ष कामांपैकी सुमारे 3,36,859 मृदसंधारण व जलसंधारण कामांची प्रत्यक्ष स्थळ पडताळणी करण्यात आलेली आहे. शासन निर्णय

    दि.31.03.2026 रोजीपर्यंत पूर्ण करण्यात येईल.
    18 केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक – 2.0 या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडून रु.100 कोटी केंद्रीय सहाय्य प्राप्त करणे. कार्यवाही अपूर्ण (प्रगतीपथावर) केंद्र शासनाकडून रु.71.25 कोटी निधी प्राप्त झाला आहे. केंद्र शासनाचे मंजूरी पत्र दि.31.10.2025 रोजीपर्यंत पूर्ण करण्यात येईल.
    19 तुकाई उपसा सिंचन योजना, अहिल्यानगर – 90% काम पूर्ण करणे. कार्यवाही अपूर्ण (प्रगतीपथावर) सदर योजनेचे 82 % काम पूर्ण झाले आहे.
    १. तुकाई उपसा सिंचन योजना ता. कर्जत, जि. अहिल्यानगर ऊर्ध्वगामी नलीकेचे उर्वरित काम करण्यासाठी स्थानिक संबंधित शेतकर्यांचा विरोध असल्याने त्या ठिकाणी काम करता आले नाही. संबंधित शेतकर्यांसमवेत चर्चा करून काम करण्याचे नियोजन आहे.
    २. तुकाई उपसा सिंचन योजना ता. कर्जत, जि. अहिल्यानगर या योजनेच्या पंपगृहाजवळील फोर बे चे बांधकाम कुकडी डाव्या कालव्या लगत चालू आहे. कालव्यास आवर्तन चालू असल्याने काम करण्यात अडचण येत आहे.
    ३. पावसाळ्याचे दिवस असल्याने ऊर्ध्वगामी नलीकेच्या कार्यस्थळापर्यंत जाण्यास अडचण येत आहे.विद्युत विभागाची भूमिगत केबलची (डबल सर्कीट) उभारणी करणेसाठी बिटकेवाडी-वालवड रस्ता ओलांडून दोन ठिकाणी आडवा बोअर करणेची परवानगी राष्ट्रीय महामार्ग विभाग यांचेकडे प्रस्तावित आहे, परवानगी मिळाल्यानंतर काम पूर्ण करण्यात येईल.
    ४. विद्युत विभागाची कर्जत ते वालवड रस्त्यालगत रस्त्याच्या मध्यभागापासून अंदाजे ५० फूट अंतरावर उजव्या बाजूस समांतर अंदाजे ८०० मीटर अंतरापर्यंत भूमिगत केबल टाकणेचे कामाकरीता खोदकाम करणेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्तावित आहे, परवानगी मिळाल्यानंतर काम पूर्ण करण्यात येईल.
    छायाचित्र उर्वरित कामे दि.30 ऑक्टोबर, 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येतील.
    20 माजी मालगुजारी तलाव दुरुस्ती योजना 1077 कामांचे कार्यारंभ आदेश निर्गमित करणे. कार्यवाही अपूर्ण (प्रगतीपथावर) 1077 पैकी 21 माजी मालगुजारी तलावांची प्रशासकीय मान्यता रदद करण्यात आली असून, 925 कामांना कार्यारंभ आदेश दिलेले आहेत. उर्वरीत 131 कामांपैकी नागपूर येथील 27 कामे व चंद्रपूर येथील 104 या कामांची निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. कामनिहाय यादी

    उर्वरित कामे दि.30 ऑक्टोबर,2025 पर्यंत पूर्ण करण्यात येतील.
    21 माजी मालगुजारी तलाव दुरुस्ती योजना माजी मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीची किमान 500 कामे पूर्ण करणे. कार्यवाही अपूर्ण (प्रगतीपथावर) माजी मालगुजारी तलाव दुरुस्तीची 88 कामे पूर्ण करण्यात आली आहे.
    माजी मालगुजारी तलावांमध्ये पाणी असल्यामुळे सध्या काम करणे शक्य नाही. तथापि, तलावातील पाण्याची पातळी कमी झाल्यावर उर्वरीत कामे करण्यात येतील.
    जिल्हानिहाय यादी

    उर्वरित कामे दि.30 जून, 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येतील
    एकूण मुद्दे -21 कार्यवाही पूर्ण – 16 कार्यवाही अपूर्ण – 5